Wednesday, January 22, 2025
Homeताज्या घडामोडीटिकू तलसानिया रुग्णालयात, ब्रेन स्ट्रोकमुळे तब्येत ढासळली

टिकू तलसानिया रुग्णालयात, ब्रेन स्ट्रोकमुळे तब्येत ढासळली

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता टिकू तलसानिया (७०) रुग्णालयात आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्याची तब्येत ढासळली आहे. टिकूची पत्नी दीप्ती तलसानियाने ही माहिती दिली. एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी गेला असताना रात्री आठच्या सुमारास टिकू तलसानियाची तब्येत बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या टिकू तलसानियावर उपचार सुरू आहेत, अद्याप संकट टळलेले नाही.

Ankita Walawalkar Good News : ‘बिग बॉस मराठी 5’ फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!

रात्री टिकू तलसानिया एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला होता. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रश्मी देसाई टिकू तलसानियाच्या पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घेताना दिसत आहे.

Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! ‘ही’ रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

टिकू तलसानियाची कारकिर्द

टिकू तलसानियाने विनोदी अभिनेता म्हणून अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले आहे. त्याने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे. ‘कुली नंबर १’ (१९९५), ‘राजा हिंदुस्तानी’ (१९९६), ‘जुडवा’ (१९९७) आणि ‘हम हैं राही प्यार के’ (१९९३), ‘अंदाज अपना अपना’ (१९९४), ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (१९९८), ‘राजू चाचा’ (२०००), ‘हंगामा’ (२००३), ‘धमाल’ (२००७) ‘देवदास’ (२००२) या चित्रपटांमध्ये टिकू तलसानियाने अभिनय केला आहे. ‘साजन रे फिर झूट मत बोलो’, ‘ये चांदा कानून है’, ‘एक से बधकर एक’ आणि ‘जमाना बदल गया है’ या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये टिकू तलसानियाने काम केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -