फ्रान्स : जगभरात सध्या ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२६’ची जोरदार चर्चा रंगली आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांसोबत यंदा मराठी कलाकारांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर दमदार उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील लाडकी जोडी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये हटके अंदाजात एन्ट्री करत मराठी संस्कृतीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकावला.
मुंबई : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक विक्रम मोडत आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. ‘वेड’नंतर ‘बाईपण ...
कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची एन्ट्री होताच उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. दोघांनीही पूर्णपणे मराठमोळा आणि पारंपरिक लूक करत महाराष्ट्राच्या संस्कृतीची खास झलक जगासमोर सादर केली. अशोक मामांनी पांढऱ्या रंगाचा एलिगंट सूट, काळी पँट आणि साधा पण रुबाबदार लूक केला होता. रेड कार्पेटवर येताच त्यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यांच्या या साधेपणाने आणि संस्कृती जपणाऱ्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली असून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तर दुसरीकडे निवेदिता सराफ यांनी नेसलेल्या आकर्षक पैठणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक दागिने, केसांमध्ये माळलेला गजरा आणि मराठमोळा साज यामुळे त्यांचा लूक अधिकच खुलून दिसत होता. कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांनी मराठी संस्कृतीची सुंदर ओळख करून दिली. त्यांच्या या एलिगंट आणि पारंपरिक अंदाजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सोलापूरचा ...
विशेष म्हणजे अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी एकमेकांचा हात धरत अतिशय रोमँटिक आणि गोड अंदाजात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्यांच्या या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. अनेक नेटकऱ्यांनी या जोडीला “मराठी इंडस्ट्रीचं पॉवर कपल” म्हणत कौतुक केलं आहे. दोघांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram





