मुंबई : बिग बॉस मराठी ५ फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री धमाकेदार झाली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अंकिताला अधिक लोकप्रियता मिळाली. इन्फ्लुएंसर अंकिता नेहमीच तिच्या कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने चाहत्यांना लग्नासंबंधी खुशखबर दिली होती. तिचा होणार नवरा कुणाल भगत हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक देखील आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे.
Crime : दोघात तिसऱ्याचा बळी! दुखावला गेलेल्या प्रियकराने केली मित्राची हत्या
अंकिता आणि कुणाल दोघेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असतात. लग्नाच्या खरेदीचेही ते अपडेट चाहत्यांना देत असतात. काही दिवसांपूर्वी काही अंकिताने तिची गाडी विकली. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
मात्र काल अंकिताने चाहत्यांना पुन्हा एकदा खुशखबर दिली आहे. ‘ती आली आहे’ अशा तिच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काल अंकिताने एक नवी गाडी खरेदी केली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते देखील खुश झाले आहे.