नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उल्टा’ मालिका गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांनाही जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच मालिकेमध्ये गुरूचरण सिंह सोढीचं पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सध्या चर्चेत आला आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. अभिनेता रुग्णालयात दाखल झाला असून त्याने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
गुरुचरण सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावलेली दिसत आहे. हॉस्पिटलमधूनच गुरुचरण सिंगने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “माझी तब्येत खूपच खराब झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक तपासण्या केल्या आहेत. लवकरच मी तुम्हाला माझा हेल्थ अपडेट देईन.” व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल गुरुपूरबच्या दिवशी, गुरु साहेबांनी मला नवं जीवन दिलं. मी त्यांचे अनेक वेळा आभार मानतो. आपणा सर्वांनाही धन्यवाद, गुरु साहेबांच्या कृपेने आज मी जिवंत आहे. सर्वांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद.”
Facebook Instagram News : Facebook, Instagram चालवण्यासाठी लागणार परवानगी; सरकारची नवीन योजना काय?
अभिनेता गुरुचरण सिंग एप्रिल २०२४ मध्ये, कमालीचा चर्चेत आला होता. अभिनेता २५ दिवस बेपत्ता होता. अभिनेता दिल्लीतील त्याच्या घरातून एका मिटिंगसाठी बाहेर पडला होता आणि बराच वेळ परतलाच नव्हता. त्या २५ दिवसांत अभिनेत्याने गुरूद्वारेत सेवा करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो असं त्याने स्वत: सांगितले होते. अभिनेत्याने घर सोडून जाण्याचे कारण सांगितले होते. अभिनेत्याने त्याच्यावर १ ते १.५ कोटींचे कर्ज झाले होते असे सांगितले होते. या तणावामुळे त्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून त्याने जेवण सोडले होते. त्याने याकाळात फक्त लिक्विड डाएट घेतला होता असे सांगितलं. नंतर तो मे महिन्यात दिल्लीतील घरी परतला. नंतर त्याने खुलासा केला होता की, आध्यात्मिक प्रवासाला निघाला आहे.