मुंबई : देशामध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे कोणत्याही वयोगटातील मुले फेसबुक किंवा इंस्टाग्रामला आलं स्वतःच खात उघडू शकतात. या प्लॅटफॉर्मवर अनेकांचे अकाऊंट्स आहेत. मात्र आता वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. देशात आता सोशल मीडियासाठी नियम बनवण्यात येणार आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण कायदा संसदेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता १८ वर्षाखालील मुलांना सोशल मिडिया वापरणाऱ्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमानुसार, अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर अकाऊंट उघडणे सोपे नाही. अकाऊंट उघडण्याआधी आई, वडीलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आई, वडीलांची परवानगी घेण्यासाठी डिजिटल टोकनचासुद्धा वापर केला जाणार आहे.
CM Devendra Fadnavis : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होतेय ड्रग्जची देवाणघेवाण!
सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहेत. सोशल मीडियावर अकाउंट बनवण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे कोणत्याही वयोगटातील मूल खाते तयार करू शकतात. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले सहजपणे अकाऊंट उघडू शकत नाहीत. उलट यासाठी त्यांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणे आवश्यक असेल, असं या नवीन नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने १८ फेब्रुवारी पर्यंत जनतेचे मत मागवले आहे. यावर कोणतीही व्यक्ती आपले वैयक्तिक मत मांडू शकते. सर्वांचे मत घेऊन त्यावर विचार केला जाईल. त्यानंतर सरकार नियम लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पडताळणीसाठी डिजिटल टोकनचा वापर केला जाईल. अशी व्यवस्था निर्माण केली जाईल, यामध्ये पालकांना परवानगी देणे किंवा न देण्यास फारसा त्रास सहन करावा लागणार नाही. टोकन जे वापरले जाईल. ते तात्पुरते असेल. म्हणजे गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अडचण नाही, असंही ते म्हणाले.
डिजिटल टोकन देणार
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या मते, पडताळणीच्या वेळी आभासी टोकन तयार केले जाईल आणि ते तात्पुरते असेल. डिजिटल डेटा वापरून आभासी टोकन तयार केले जाईल. या मसुद्यानुसार मुलाने त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे घोषित केल्यावर सोशल मीडियावर अकाऊंट उघडताना पालकांची संमती किंवा पडताळणी आवश्यक असेल. जेव्हा मुलाला अकाउंट तयार करावे लागेल, तेव्हा तो त्याचे वय कमी का घोषित करेल?, अशी मत तज्ञांनी व्यक्त केली आहेत.