Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीबलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू

बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू

बलुचिस्तान : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला आणि ३० जवान जखमी झाले. ही माहिती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Flight Engine Fire : नेपाळमध्ये विमानाला आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग

माजीद ब्रिगेडने बलुचिस्तानमधील तुर्बत शहरापासून आठ किमी अंतरावरील बेहमन भागात केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला, असे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना सांगितले. हल्ला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पावणेसहा वाजता झाला. कराची येथून तुर्बतमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयाच्या दिशेने १३ वाहनांचा ताफा जात होता. या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ताफ्यातील एक बस पूर्णपणे नष्ट झाली आणि इतर अनेक वाहनांचे कमी – जास्त प्रमाणात नुकसान झाले.

कॅनडाचे पंतप्रधान राजीनामा देणार ?

पाकिस्तान या धक्क्यातून सावरण्याआधीच तालिबानने पाकिस्तान विरोधात कोंकुरसी ही गाइडेड मिसाईल तैनात केल्याचे जाहीर केले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर, रणगाडे, कमी उंचीवरून उडणारी विमानं, युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई आणखी तीव्र झाली तर कोंकुरसी हे क्षेपणास्त्र तालिबानला पाकिस्तान विरोधात वरचष्मा मिळवून देण्यास सक्षम आहे, असे मत शस्त्रास्त्र अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना सात बिलियन डॉलरचा आधुनिक शस्त्रांचा साठा सोडून दिला होता. यातील काही शस्त्र लगेच वापरण्यायोग्य स्थितीत होती. तर काही शस्त्र ही डागडुजी करून वापरता येतील अशा स्थितीत होती. तालिबानने या शस्त्रसाठ्याची डागडुजी करून तो वापरण्यायोग्य स्थितीत आणला असल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -