काठमांडू : नेपाळमधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. बुद्ध एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागली, त्यानंतर काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.या विमानामध्ये क्रू मेंबर्ससह ७६ प्रवासी होते.या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, ९ हुतात्मा
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्ध एअरचे विमान राजधानी काठमांडूपासून ४३ किलोमीटर पूर्वेला त्याच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याने उतरल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ते एकाच इंजिनवर उड्डाण करून काठमांडूला परतले. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॅन्युअल लँडिंग केले. विमानात क्रू मेंबर्ससह ७६ लोक होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेबाबत विमान कंपनीनेही निवेदन प्रसिद्ध केले आहे. विमानातील सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती दिली. विमानाला आग कशी लागली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले आहे.
Buddha Air flight makes VOR landing at Tribhuvan International Airport in Nepal’s Kathmandu after sustaining a flame out from the left engine. The aircraft had 76 people on board including the crew: Tribhuvan International Airport pic.twitter.com/IHbxcXriRk
— ANI (@ANI) January 6, 2025
बुद्ध एअरलाइन नेपाळची मोठी एअरलाइन कंपनी आहे. या एअरलाइनला २३ एप्रिल १९९६ ला सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज सुरेंद्र बहादुर बासनेट यांच्या मुलगा बिरेंद्र बहादुर यांनी ही एअरलाइन कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी नेपाळमध्ये डोमेस्टिक सेवा देतात. या कंपनीची नेपाळमधील काठमांडू पासून भारतातील वाराणसीसाठी उड्डाण करतात.