सुमारे नऊ वर्षांनंतर एखादा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज म्हणजेच सोमवार ११ मे रोजी याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या घोषणेत म्हंटलं आहे कि; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ ते १५ मे दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून होत आहे. (Donald Trump China Visit)
पश्चिम आशिया संकटावर चर्चा होण्याची शक्यता :
मुंबई : क्रूड ऑइलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आज जागतिक बाजारपेठांमध्ये (Share Market) कमजोरीचे संकेत मिळत आहेत. मात्र, मागील सत्रात अमेरिकन बाजार मजबूत ...
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक :
व्हाईट हाऊसच्या प्रिन्सिपल डेप्युटी प्रेस सेक्रेटरी अॅना केली यांच्या माहितीनुसार, ट्रम्प बुधवारी संध्याकाळी बीजिंगमध्ये पोहोचतील. गुरुवारी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होईल. कार्यक्रमात टेंपल ऑफ हेवनला भेट आणि राजकीय मेजवानीचाही समावेश आहे. यानंतर शुक्रवारी दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटणार असून चहापान आणि वर्किंग लंचचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षाच्या अखेरीस शी जिनपिंग यांचा अमेरिकेचा दौरा होण्याची शक्यता असल्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. (Donald Trump China Visit)
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. युद्धविरामासंदर्भात इराणने अमेरिकेच्या नव्या प्रस्तावाला पाकिस्तानमार्फत ...
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण कोरियातील बुसान येथे होणारी ही चर्चा दोन्ही नेत्यांमधील महत्त्वाच्या सहमतीवर आणि अलीकडील दूरध्वनी संभाषणावर आधारित असेल. या चर्चेत आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.दरम्यान, तैवानचा मुद्दा ट्रम्प-शी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की तैवानबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात तैवानच्या मुद्द्यावर सातत्याने चर्चा होत असली तरी अमेरिकेचे अधिकृत धोरण पूर्वीप्रमाणेच कायम आहे.
नेपाळ : नेपाळची राजधानी काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Tribhuvan International Airport) येथे सोमवारी मोठी विमान दुर्घटना टळली. लँडिंगच्या वेळी एका ...




