नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहत्या घरातचं आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा आणि तिच्या ४५ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये संशयास्पदरित्या आढळून आला.
या घटनेतील मृत गीता जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी (वय ४५) हे दोघेही कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. बुधवार १ जानेवारी रोजी सायंकाळी दुर्गंध जाणवू लागला. अनेकांना इमारतीतल्या पाइप गॅसमधून वायू गळती झाल्याचा संशय आला. काही रहिवाशांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर वास कुठून येत आहे याचा शोध सुरू झाला.
Trupti Cottage Alibug : ‘या’ अभिनेत्याच्या बायकोने सुरू केला अलिबागमध्ये व्यवसाय
जग्गी यांच्या घरातून वास येत असल्याचे लक्षात आले. वारंवार बेल वाजवून प्रतिसाद मिळत नव्हता आणि घरातून येणाऱ्या दुर्गंधीची तीव्रता दाराजवळ आणखी जाणवत होती. अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा निर्णय झाला. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच सर्वांना धक्का बसला. गीता जग्गी आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह बेडवर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला. या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.