मुंबई : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी अभिनयासोबत व्यवसायाकडे वाटचाल केलेली दिसून येते आहे. दागिन्यांचा व्यवसाय , कपड्यांचा व्यवसाय तर काहींनी हॉटेलसारख्या व्यवसायांना पसंती दाखवली आहे. अशातच मराठी इंडस्ट्री मधला धिंगाणेबाज कलाकार तसेच एनर्जीचा बादशहा अशी ओळख असलेला सिद्धार्थ जाधव याच्या पत्नीची व्यवसायाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. सिद्धार्थने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. तो स्वतः एक लोकप्रिय कलाकार असला तरी त्याची बायको तृप्ती सुद्धा एक अभिनेत्री होती. पण नंतर तिने संसार सांभाळण्यास पसंती दर्शवली. आता तृप्ती संसारा सोबतच स्वतःचा व्यवसाय सुद्धा सांभाळत आहे.
Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला
वर्षाच्या सुरवातीलाच सिद्धार्थच्या बायकोने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे. तृप्ती जाधव हिने अलिबाग येथे स्वतःच होम स्टे सुरू केलयं. या होम स्टेला तिने तृप्ती कॉटेज असं नाव दिलयं. तृप्तीच कॉटेज अलिबाग मधल्या नागाव येथे असून पर्यटक येथे राहू शकतात. या कॉटेजची सजावट तृप्तीने स्वतः केली आहे. तृप्तीचा हा नवा व्यवसाय असला तरी या आधी देखील मुलींच्या नावाने तिने कपड्यांचा व्यवसाय सुरु केला होता.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टनंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने स्वतःच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत बायकोची कौतुकाने पाठ थोपटली आहे.