Friday, June 20, 2025

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक
पुणे : सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तो खून झाल्याच्या घटनेपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आतिश जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जाधवला धाराशिवमधूून गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सतीश वाघ यांचा खून झाल्यापासून पोलीस जाधव याचा शोध घेत होते. सुरुवातीला पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी ) या दोघांना ताब्यात घेतले होते. आता जाधव याला अटक केली आहे.



विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे 9 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फुरसुंगी परिसरात मॉर्निंक वॉक करीत होते. याची संपूर्ण माहिती हल्लेखोरांनी गोळा केली होती.

वाघ किती वाजता व्यायामासाठी घराबाहेर पडतात, त्यांच्यासोबत कोणकोण असते, परिसरात सीसीटीव्ही आहेत का नाही, अपहरणानंतर त्यांना कुठे न्यायचे, अपहरणासाठी विनाक्रमांक मोटार वापरण्याची अशी पुरेपूर दक्षता घेत पाच जणांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण करून खून केला होता.
Comments
Add Comment