नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA च्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे झाले असून, संपूर्ण कट पाकिस्तानात बसून रचण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तपासात समोर आले आहे की लष्कर आणि TRF चा दहशतवादी साजिद जट्ट उर्फ ‘लंगडा’ लाहोरमधून संपूर्ण ऑपरेशन रिमोट कंट्रोल करत होता.
‘लंगडा’ ठरला मास्टरमाइंड
NIA ने आपल्या चार्जशीटमध्ये सैफुल्लाह उर्फ साजिद जट्ट उर्फ ‘लंगडा’ याला या हल्ल्याचा मुख्य आरोपी क्रमांक-१ म्हटले आहे. एजन्सीनुसार, तो पाकिस्तानातील लाहोरमध्ये बसून दहशतवाद्यांना सतत निर्देश देत होता. तपासात प्रथमच त्याची ओळखही पक्की करण्यात आली आहे. चार्जशीटमध्ये समाविष्ट असलेल्या फोटोची ओळख काश्मीरमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलाकडून करून घेण्यात आली, ज्याने तोच आपला वडील असल्याची पुष्टी केली. NIA याला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानत असून, यामुळे त्याच्या नेटवर्क आणि अस्तित्वाची अधिकृत पुष्टी झाली आहे.
पाकिस्तान : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी दोन सशस्त्र गटांमध्ये भीषण चकमक झाली. या संघर्षात किमान १४ दहशतवादी ठार ...
कोण आहे साजिद जट्ट?
साजिद जट्ट हा पाकिस्तानातील कसूरचा रहिवासी असून, २००५ मध्ये घुसखोरी करून तो काश्मीरमध्ये पोहोचला होता. कुलगामसह दक्षिण काश्मीरमध्ये त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले, स्थानिक तरुणांचे ब्रेनवॉश केले आणि OGW (Over Ground Workers) चे मजबूत जाळे उभे केले. २००५ ते २००७ दरम्यान तो काश्मीरमध्ये राहिला, स्थानिक महिलेशी लग्न केले आणि नंतर पाकिस्तानात परतला. NIA च्या माहितीनुसार, गोळी लागल्यामुळे त्याचा एक पाय निकामी झाला होता. त्यामुळे तो कृत्रिम पाय वापरत होता आणि याच कारणामुळे त्याला ‘लंगडा’ म्हटले जात होते.
TRF उभारण्यात महत्त्वाची भूमिका
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर लष्कर-ए-तैयबाने आपली रणनीती बदलली आणि TRF (The Resistance Front) या फ्रंट संघटनेला पुढे केले. साजिद जट्टने ही संघटना उभारणे, सोशल मीडिया नेटवर्क तयार करणे आणि जमिनीवर मॉड्यूल उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हीच संघटना खोऱ्यातील टार्गेट किलिंग आणि मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष ...
हल्ल्याचा संपूर्ण कट
चार्जशीटनुसार, पहलगाम हल्ला हे आधीपासून आखलेले ऑपरेशन होते.
१५-१६ एप्रिल : साजिदने तीन दहशतवादी - फैजल जट्ट उर्फ सुलेमान, हबीब उर्फ छोटू आणि हमजा अफगानी यांना बैसरन खोऱ्याची रेकी करण्यासाठी पाठवले. परिसरातील सुरक्षा आणि पर्यटकांच्या हालचालींचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला.
हल्ल्याच्या दिवशी : लाहोरमधून रिअल-टाइममध्ये लोकेशन आणि निर्देश देण्यात येत होते.
NIA च्या मते, दहशतवाद्यांची प्रत्येक हालचाल, हल्ला, लपण्याची जागा आणि पळून जाण्याचा मार्ग हे सर्व पाकिस्तानातून ठरवले जात होते.
मुंबई : देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला अनेकांनी हा प्रकार केवळ विनोद किंवा ...
स्थानिक नेटवर्कची मोठी भूमिका
हल्ल्यापूर्वीही संधी होती
२२ एप्रिल रोजी परवेज आणि बशीर यांनी त्याच दहशतवाद्यांना पुन्हा बैसरन पार्कजवळ पाहिले होते, मात्र त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी माहिती मिळाली असती तर २६ लोकांचे प्राण वाचू शकले असते.
ठाणे : ठाणे पश्चिममधील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
फॉल्स फ्लॅग कटाचा पर्दाफाश
पाकिस्तान कनेक्शनचे ठोस पुरावे
मृत दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनच्या तपासातही मोठा खुलासा झाला. एक फोन लाहोरमधून खरेदी करण्यात आला होता, तर दुसरा कराचीमधून. NIA च्या मते, हे पुरावे स्पष्ट करतात की दहशतवाद्यांना केवळ पाकिस्तानातून निर्देशच मिळत नव्हते, तर संपूर्ण कटही तिथेच रचला गेला होता. NIA च्या चार्जशीटमुळे हे स्पष्ट झाले आहे की पहलगाम हल्ला ही कोणतीही स्थानिक घटना नव्हती, तर सीमापारून चालवण्यात आलेले सुनियोजित दहशतवादी ऑपरेशन होते. ‘लंगडा’सारख्या मास्टरमाइंडच्या माध्यमातून पाकिस्तानातून चालणारे हे नेटवर्क अद्याप सक्रिय असून, ते संपवणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे.




