मुंबई: हिंदू धर्मात गायीला अतिशय पूजनीय मानले आहे. लोक केवळ गाईची पुजाच करत नाहीत तर तिला ३३ कोटींची देवता मानतात. कामाच्या व्यापाराच्या ठिकाणीही गायीला कामधेनु स्वरूपात पुजले जाते.
ज्योतिषाचार्यांच्या मते गायीला दरदिवशी सकाळी चपाती खाऊ घातल्यास त्या व्यक्तीला ३३ कोटींच्या देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो.
अशातच जर तुम्ही आठवड्याच्या तीन दिवशी एक विशेष उपाय करत असाल तर सूर्य, बृहस्पती आणि शनीची कृपा सदैव राहते.
जर कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल तर रविवारच्या दिवशी गायीला तुपाची चपाती खाऊ घाला. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल.
जर कुंडलीत बृहस्पती कमजोर असेल तर प्रत्येक गुरूवारी भगवान विष्णूची पुजा करा. तसेच सकाळी गायीला गूळ, चणे आणि चण्याची डाळ खाऊ घाला.
हा एक उपाय केल्याने गुरू मजबूत होतो. शुभ बृहस्पती भाग्य, आनंद आणि सुखी वैवाहिक जीवन घेऊन येते. विवाहात येणारे अडथळेही यामुळे दूर होतात.
शनिवारचा दिवस शनीला समर्पित होतो. जर एखाद्या व्यक्तीवर शनीची साडेसाती असेल तर या दिवशी गायीला चपाती खाऊ घातली पाहिजे.
यामुळे केवळ शनि दोषापासून मुक्ती मिळत नाही तर करिअरमधील अडथळेही दूर होतात. तसेच धन प्रवाह वाढतो.