- खोटी कारणे सांगून अनेक प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमधून एक माणूस स्टेशनवर होणाऱ्या फ्रॉड बद्दल लोकांना सावध करताना दिसत आहे.
नेमका प्रकार काय ?
- अनेक फांद्यावरील पक्ष्यांची घरटी, पिल्लांना धोका, मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या मान्सून पूर्व कामांच्या पार्श्वभूमीवर सध्या झाडांच्या ...
या घटनेचा उद्देश कोणाला कमी लेखणे नसून, नागरिकांना सतर्क करणे असा आहे. मोठी किंवा छोटी रक्कम यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या घटनांमुळे कामगार आणि प्रवाशांचे कष्टाचे पैसे चुकीच्या हातात जाण्याची शक्यता असते.
गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी कोणालाही मदत करताना थोडी चौकशी करणे आणि खात्री करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे.
At Andheri station, a woman asked me for money saying her cash was stolen and she needed a ticket.
But I noticed the same story being repeated to multiple people. Sharing this only for awareness, It’s not about ₹10–₹20, small or big amount — it’s about misleading people who… pic.twitter.com/ueJtOWuzle — New Bharat Speaks 🇮🇳 (@Vishwas1228) April 30, 2026
रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करताना सतर्क राहणे, संशयास्पद वागणूक दिसल्यास रेल्वे सुरक्षा दल किंवा पोलिसांना माहिती देणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे.
अंधेरी स्टेशनवरील या घटनेतून एकच संदेश मिळतो की “प्रत्येक गोष्ट ऐकून लगेच विश्वास ठेवू नका, सतर्क रहा आणि आपले कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा.”





