Thursday, April 30, 2026

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून झिशान सिद्धिकी यांचा विधानपरिषद सदस्य पदाचा अर्ज दाखल

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून झिशान सिद्धिकी यांचा विधानपरिषद सदस्य पदाचा अर्ज दाखल

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे आहे. पक्षातून विधान परिषद कोण लढवणार याची यादी सर्वच पक्षणाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्धिकी यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.

काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. अखेर सखोल विचारविनिमयानंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावावर एकमत झाले. अखेर अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. (Maharashtra Vidhan Parishad Election 2026 )

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddiqui) यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. मात्र, काही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांची नावेही समोर येत असल्याने अंतिम निर्णय स्पष्ट होत नव्हता. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर पक्षाने झिशान सिद्धीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. आता झिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.

भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026) सुनील कर्जतकर माधवी नाईक संजय भेंडे विवेक कोल्हे प्रमोद जठार प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026) नीलम गोऱ्हे बच्चू कडू

शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026) महाविकास आघाडी-

अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा