Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
April 30, 2026 09:00 PM
Summer Special Trains
मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविणार आहे.
तपशील पुढीलप्रमाणे आहे:
1 ) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ सेवा)
गाडी क्रमांक 01003 उन्हाळी विशेष गाडी ०४.०५.२०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.२० वाजता सुटेल व मडगाव येथे त्याच दिवशी २२.४० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01004 उन्हाळी विशेष गाडी ०३.०५.२०२६ (रविवार) रोजी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०६.२० वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना :
एक वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ०७ सामान्य द्वितीय आणि ०२ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण :
गाडी क्रमांक 01003 साठी विशेष शुल्कासह आरक्षण ०२.०५.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे सामान्य दराने UTS प्रणालीद्वारे उपलब्ध राहतील. प्रवासी तिकिट बुकिंगसाठी RailOne अॅप देखील डाउनलोड करू शकतात.
गाड्यांच्या स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.