Thursday, April 30, 2026

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णी चक्क ५ तास अडकली ट्रॅफिकमध्ये; शेअर केला व्हिडीओ

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णी चक्क ५ तास अडकली ट्रॅफिकमध्ये; शेअर केला व्हिडीओ

मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीही ही नवी नाही, परंतु एक रस्त्यांच्या कामांमुळे झालेली वाहतूक कोंडी ही अधिक त्रासदायक ठरते, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीनच वाढते. याच वाहतूक कोंडीचा अनुभव मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला देखील आला आहे. सोनाली चक्क ५ तास ट्रॅफिकमध्ये अडकली होती याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केला आहे.

तर झालं असं....

मानखुर्द परिसरात बुधवारी रात्री ( २९ एप्रिल ) रोजी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. येथील उड्डाणपुलाच्या खोदकामासाठी आणलेले मोठ यंत्र मंगळवारी रात्री रस्त्यावर कोसळल्याने बुधवारी दिवस आणि रात्री सुद्धा या संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी होत होती. १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी लोक जवळपास चार ते पाच तास वाहतूक कोंडीत अडकले होते.

मानखुर्द परिसरात वाहतूक कोंडी

सोनाली बुधवारी आपल्या गाडीने रात्री पुण्याकडे निघाली होती. मानखुर्द परिसरात घडलेल्या त्या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास एकाच ठिकाणी अनेक लोक ४ ते ५ तास खोळंबले होते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यासगळ्यात न राहवून नक्की काय घडतंय हे सांगायला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने याचा व्हिडिओ करत आपल्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केला आहे.

सोनालीने व्हिडिओत काय सांगितलं आहे?

सोनाली म्हणाली; " नमस्कार मी मानखुर्द ब्रिजवर आहे... आता जवळपास पाच तास झाले असून मी या वाहतूक कोंडीत अडकली आहे. मी पुण्याला चालले होते... पण तुम्ही आजूबाजूला कशाप्रकारे ट्रॅफिक जॅम झाले आहे हे पाहू शकता. आम्ही ट्रॅफिक कंट्रोल टीमला सुद्धा फोन केला होता, पण त्यांचे असं म्हणणे आहे की.. शांत राहा, पॅनिक होऊ नका. कारण ही वाहतूक कोंडी खूप मोठी आहे. त्यांना सुद्दा कल्पना नाहीये की, ही वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सगळं पूर्ववत केव्हा होईल. आम्हाला आता मागे देखील फिरत येत नाही आहे. कोणी विरुद्ध दिशेने पुढे जात असाल तर आम्हाला सांगा पुढे नक्की काय झालं आहे ते.' किंवा आमच्यासारख्या प्रवाशांची मदत करा.

कमेंट्समध्ये केले ट्रॅफिकचे अनुभव शेअर

सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक अभिनेत्रींनी कमेंट्स करत मी देखील याच वाहतूक कोंडीत अनेक तास अडकले आहे. काळजी घ्या, तसेच अनेकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >