मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक ०१/०२.०५.२०२६ आणि ०२/०३.०५.२०२६ रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स
मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) अतिक्रमण कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:
दिनांक ०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र) आणि ०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र)
ब्लॉकचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
ब्लॉक- ए
ब्लॉकची तारीख: ०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र) ब्लॉक कालावधी: ०२.०५.२०२६ रोजी ०१.४० ते ०३.४० वाजेपर्यंत ब्लॉक विभाग: कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्ग (दोन्ही स्थानके वगळून)
ब्लॉक- बी
ब्लॉकची तारीख: ०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र) ब्लॉक कालावधी: ०३.०५.२०२६ रोजी ०१.३० ते ०३.३० वाजेपर्यंत ब्लॉक विभाग: अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाउन दक्षिण-पूर्व मार्ग (अंबरनाथ वगळून व बदलापूर समाविष्ट)
ब्लॉकमुळे होणारे परिणाम पुढीलप्रमाणे असतील:
उपनगरी गाड्यांचे संचालन: ब्लॉक कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान उपनगरी सेवा पूर्णतः रद्द राहील.
पहिली व शेवटची लोकल
०१/०२.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र): ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल BL61 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –बदलापूर, जी ०१.०५.२०२६ रोजी २३.५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल S4 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , जी ०२.०५.२०२६ रोजी ०३.३५ वाजता कर्जत येथून सुटेल.
०२/०३.०५.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र): ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल S41 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –कर्जत, जी ०२.०५.२०२६ रोजी २३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल S4 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , जी ०३.०५.२०२६ रोजी ०३.३५ वाजता कर्जत येथून सुटेल.
मेल/एक्सप्रेस गाड्यांचे संचालन:
खालील गाड्या ०१.०५.२०२६ व ०२.०५.२०२६ रोजी कर्जत – पनवेल मार्गे वळविण्यात येतील:
गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस. गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस
कल्याण येथे नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस/हॉलिडे विशेष गाड्या आवश्यकतेनुसार वळविण्यात किंवा नियमन करण्यात येतील.
हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.






