पत्नी रितीकाने फोटो शेअर करत दिली माहिती
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितीका यांना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सर्व चाहत्यांना ज्युनिअर हिटमॅनचे नाव काय असणार? कधी जाहीर होणार? याची उत्सूकता आणि प्रतिक्षा होती. अखेर आता ही प्रतिक्षा संपली असून ज्युनिअर रोहितचं नाव जाहीर करण्यात आले आहे. रितीकाने सोशल मीडियावर पोस्ट करत छोट्या रोहितच्या नावाची घोषणा केली आहे.
रोहित शर्माची पत्नी रितीकाने ख्रिसमस थीमवर आधारीत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये चौघांची नावं दिली आहेत. त्यानुसार रोहित शर्माचा रो, रितीकाचा रित्स, मुलगी समायराचं सॅमी आणि मुलाचं नाव अहान असे दिसत आहे. रितीकाने यासह या इंस्टा स्टोरीत ख्रिसमिस हा हॅशटग वापरला आहे.