गोंदिया अपघातातील शिवनेरीचा चालक निलंबित
गोंदिया : दोन दिवसांपूर्वी भंडारा इथून गोंदियाच्या दिशेला जाणाऱ्या एका शिवशाही बसचा भीषण अपघात घडला होता. (Gondia Shivshahi Bus Accident) यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी तपासात मोठी अपडेट समोर आली आहे.
गोंदिया अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याने याआधीही सात अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर गोंदिया शिवशाही बस अपघातातील बस चालक प्रणय रायपुरकरवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी आरोपी प्रणय रायपूरकरला निलंबनाचे आदेश दिले आहेत. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक असणार आहे.