मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं होतं. एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो करणं, एकत्रित फोटो हटवणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र न दिसणं यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना अधिक हवा मिळाली होती. अखेर या सर्व अफवांवर स्वतः मौनी रॉयनेच अधिकृत प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.
मौनी आणि सूरज यांनी संयुक्त निवेदन जारी करत परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. “आम्ही दोघांनी खूप विचार करून आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम ठेवत स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे,” असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आयुष्यातील बदलते प्राधान्यक्रम, वैयक्तिक ध्येय आणि भावनिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले २०१ ...
या कठीण काळात गोपनीयतेचा आदर राखण्याचं आवाहन करत मौनीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली. “नात्यातील बदल स्वीकारणं आमच्यासाठी सोपं नाही. आम्ही दोघंही या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कृपया आम्हाला आवश्यक ती प्रायव्हसी द्या,” अशी विनंती तिने चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे.
View this post on Instagram
यासोबतच मौनीने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा आणि चुकीच्या बातम्यांबद्दल नाराजीही व्यक्त केली. “आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्या गोष्टींचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. कृपया आमच्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढू नका किंवा खोटे नरेटिव्ह तयार करू नका,” असं ती म्हणाली. या कठीण टप्प्यात दोघांच्या सन्मानाचा आदर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुंबई : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिचं नाव घेतलं जातं. आपल्या अभिनयासोबतच बोल्ड आणि स्टायलिश ...
वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी मौनी आणि सूरज यांनी एकमेकांबद्दलचा आदर कायम ठेवला आहे. “आमचं वैवाहिक नातं संपत असलं तरी मैत्री कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं. सध्या दोघेही मानसिकदृष्ट्या स्वतःला सावरण्यावर आणि ही कायदेशीर प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यांच्या लग्नाची चर्चा केवळ मनोरंजनविश्वातच नाही तर चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर झाली होती. अनेकांना त्यांची जोडी आदर्श वाटत होती. त्यामुळे अवघ्या चार वर्षांत त्यांच्या नात्याचा असा शेवट होईल, यावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये. सध्या सोशल मीडियावर अनेक चाहते मौनी आणि सूरजला भावनिक पाठिंबा देताना दिसत आहेत.





