Monday, February 10, 2025
Homeक्राईमSuicide: मुंबईत एअर इंडियाच्या पायलटची आत्महत्या, या कारणामुळे बॉयफ्रेंडला अटक

Suicide: मुंबईत एअर इंडियाच्या पायलटची आत्महत्या, या कारणामुळे बॉयफ्रेंडला अटक

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एअर इंडियाच्या पायलट सृ्ष्टी तुलीने आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ नोव्हेंबरला तिच्या भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात तिने ही आत्महत्या बॉयफ्रेंडसोबतच्या भांडणामुळे केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंड आदित्य पंडित(२७) याला अटक केली आहे.

आदित्य गेल्या काही काळापासून तिच्या घरी येत जात असे. रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भांडणानंतर आदित्य मुंबई सोडून दिल्लीसाठी रवाना झाला. यामुळे त्रस्त झालेल्या सृष्टीने त्याला फोन करून सांगितले की ती आत्महत्या करत आहे. मात्र त्याने परत येण्यास नकार दिला. दरम्यान, काही काळाने तो परतला तेव्हा सतत प्रयत्न करूनही त्याला दरवाजा खोलता आला नाही.

यावेळेस त्याने चावीवाल्याला बोलवत घराचा दरवाजा खोलून घेतला. त्यावेळी दरवाजा उघडला असता सृष्टी बेशुद्ध पडलेली असल्याचे त्याने पाहिले. त्याने तातडीने तिला मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयाने पोलीस तसेच कुटुंबियांना माहिती दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, संचालिकेला अटक

सृष्टी तुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २६ नोव्हेंबरला आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सादर केले असता त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांना फ्लॅटमध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -