मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) हळूहळू सक्रिय होत असून गुरुवारी (१२ जून) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि मेघगर्जनेसह (Thunderstorm) सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट(Yellow Alert) जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागातील पालघर जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट(Yellow Alert) देण्यात आला आहे. दिवसभर उष्ण आणि दमट (Humid) वातावरण राहण्याची शक्यता असून संध्याकाळी काही भागांत विजांच्या कडकडाटासह (Lightning) आणि वादळी वाऱ्यांसह (Gusty Winds) पाऊस पडू शकतो. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा Yellow Alert देण्यात आला असून ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Light to Moderate Rain) पडण्याचा अंदाज आहे.
Mexico : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फिफा विश्वचषक २०२६ या फुटबॉलच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. प्रथमच ४८ संघ, १०४ सामने ...
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना येलो अलर्ट(Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो. पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट(Yellow Alert) देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी ...
विदर्भ विभागात पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या १० जिल्ह्यांना येलो अलर्ट(Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी अनुभवायला मिळू शकतात.
उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान (Maximum Temperature) ३० ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. राज्यातील हवामानात (Weather Update) पुढील काही दिवस सातत्याने बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे आवश्यक खबरदारी (Precaution) घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे






