मुंबई: ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी जबरदस्ती चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा(sex racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देह-व्यापाऱ्याच्या दलदलीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका केल्याचा दावा केला आहे. सोबतच हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेची चौकशी सुरू आहे.
ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना वाचवण्यात आले.या दोन्ही महिलांना जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने गुप्त सूचना मिळाल्यानंतर कारवाई करताना अंबरनाथ रेल्वे स्टेशनजवळ हॉटेलजवळ या आरोपी महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला होता. ही महिला सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होती.
या सेक्स रॅकेटमध्ये २५ आणि २६ वर्षीय महिलांना जबरदस्ती ओढण्यात आले होते. या महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच तिची चौकशी केली जात आहे. यामुळे या रॅकेटमध्ये इतर सामील आरोपींचा शोध घेतला जाईल.