मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
नषडरिपूंचा त्याग करून मन ताब्यात कसे ठेवायचे. पंचंद्रियांवर, मनावर विजय मिळवायचा आहे. मग ते सात्विक, सज्जन, नैतिक, सुशील, विवेक बुद्धी कसे होईल. ते मनाचे श्लोक वाचल्यामुळेच. याचे पठण श्रवण केल्याने माणूस आनंदी राहतो. नित्य सद्वर्तन, सत्संग आणि सदविचार यांनी परिपूर्ण राहतो.
समर्थ हे सांगतात की, ज्याच्यात काही रामच नाही. जगण्याची दिशाभूल झालेल्या अशा माणसाने देखील रामाचे पूजक व्हावे. जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये निश्चित दिशा, आनंद, उत्साह आणि जगण्याला बळ मिळेल, मार्ग मिळेल…
प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो.
प्रत्येक श्लोकाच्या अर्थातून जीवन जगण्याचा, पुढे चालण्याचा मार्ग मिळतो. कसे वागावे? काय करू नये? आणि काय करावे! याचा एक लेखाजोखा कायम मनाचे श्लोक आपल्याजवळ देतात.
देह त्यागीता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेची क्रिया धरावी,
मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनां नीववावे.
आपला देह जरी सोडून आपण इथे प्राण निघून गेलो तरीही नावलौकिक, कीर्ती मागे राहिली असे काहीतरी करून जावे. त्या कार्यावरून आपली गणना सज्जन की, दुर्जन होतो. कसे राहिलो? काय नाव कमावले? कोणकोणत्या सज्जनांना निवविले किंवा शांत केले. हे त्यातून आपल्याला सांगायचे आहे. या चारोळीतून जीवनाचा खरा अर्थ प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या ओळींनी अर्थांनी प्राप्त होतो. पुढे जाण्याची गती, प्रगती लाभते. अतिशय चिंता करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पुढील भविष्याची, आयुष्याची, सर्वांची चिंता असते. त्यासाठी समर्थ रामदास म्हणतात,
मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते,
घडे भोगणे सर्वही कर्मयोगी, मतिमंद ते खेदमानी वियोगे असे आहे.
त्याच्याबद्दलच चिंता करून उपयोग काय? जे व्हायचं ते होणारच आहे आणि कर्मयोग आहेत. त्यामुळे कोणताही गोष्टीचा बाबा तू चिंता करून खेळ मांडू नकोस असं ते वेळोवेळी सावध करतात. तरी आपण चिंता करत असतोच. जगरहाटी प्रमाणे जगणं-मरण हे असतंच. जसे दिवस रात्र, अमावस्या पौर्णिमा आहे. तसे वेळेनुसार जगणं आणि मरण असतंच. पण आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येक जण संसारामध्ये, आयुष्यामध्ये जीवनामध्ये शोक करत असतो. त्यासाठी ते म्हणतात,
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्यातें. म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते.
यामध्ये आज तो गेल्यानंतर उद्या तुलाही जायचंय! कारण काळ हा पुढे जातच आहे. कोणीही इथे अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. अमरत्व घेऊन आलेला नाही. त्यामुळे या जगराहाटीमध्ये जन्म आणि मृत्यूचा फेरा हा कायम सुरूच राहणार.
भर मंडपातून मंगलाष्टका सुरू असताना समर्थ रामदास स्वामी तिथून पळून गेले. त्याचे कारण पुढच्या श्लोकात दिसते पाहा…
नव्हे सार संसार हा घोर आहे,
मना सज्जना सत्य शोधूनी पाहे,
जनीं वीष खातां पुढे सुख कैचें,
करी रे मना ध्यान या राघवाचे.
माणसाला राघवाचे ध्यान करायचे आहे आणि तोच सर्वस्व असताना संसारामध्ये घोर चिंता का लागून घ्यायची उगा? आणि त्याचेच पुढे आणखी एका श्लोकामध्ये प्रपंचा विषयी त्यांनी म्हटलेल आहे.
नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा,
शांती भोगी दया दक्ष योगी,
असे लोभ, क्षोभ ना दैन्यवाना,
यहीं लक्षणीं जाणिजे योगीराणा.
हे कोणाला समजेल तर त्यासाठी योगीच लागेल. मानव रुपामध्ये आपल्याला कोणतीही समाधी, एकाग्रता ध्यान किंवा सत्संग लाभेलच असं नाही. ध्यानस्थ करण्यासाठी संसारातून मन मोहपाश त्यागाव लागेल. असे तिथे दिसून येते. येथे आता देवाचेच झालो आपण तर काय होईल.
नको रे मना वाद हा खेदकारी
नको रे मना भेद नाना विकारी
नको रे मना शिकवू पुढील अंशी
अहंभाव जो राहिला तुजपासी…
जो माझा गर्व, अहंकार हे तो तुझ्या पायी मी नतमस्तक होऊन लीन होऊन ठेवलेला आहे. वाद, भेद करायचा नाही. त्याने माझी चिंता वाढेल.
अति आदरे गुण गातो.
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परि अंतरी नाम विश्वास तिथे. तेव्हा काही राजकारण समाजकारण पक्ष नातेसंबंध किंवा काही समस्या नव्हत्या. तरी देखील समर्थांनी त्यावेळी लिहिलेला आहे.
मना सर्वथा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे.
मना सत्य ते सत्यवाचे वदावे.
मना मिथ्य ते नित्य सोडूनि द्यावे.
म्हणजे पाहिलंत मंडळी!की आज आपण कोणत्याही क्षणाक्षणाला, प्रसंगाला सामोरे जात असताना मनाचे श्लोक हा अत्यंत एक प्रकारचा मार्गदर्शक आहे. हे गाईड वाट किंवा मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या मुलांना देखील त्याचे महत्त्व सांगा. हे रोज एक श्लोक चारोळीचा पाठ जीवनाचे सार याच्यातच आहेत.
मना पाप संकल्प सोडूनी द्यावा
मना सत्य संकल्प जीवी धरावा
मना कल्पना ते नको विषयांची
विकारें घडे हो जनीं सर्व चीं चीं.
मनाच्या श्लोकांमुळे बालकांच्या बालमनावर त्याचा अधिकाधिक उत्तम प्रतिसाद मिळेल.
आयोजन नक्कीच करावे जेणेकरून विद्यार्थी दहशत बालकांच्या बालमनावर त्याचा अधिकाधिक उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि तो परिणाम विचार प्रवर्तक ठरेल.