स्थायी समितीत सदस्यांनी मागणी
विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या अवशेषांचे पर्यावरण पुरक शास्त्रोक्त पध्दतीने विघटन करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंद असताना पर्यावरणपुरक गणेशमूर्तींबाबत प्रशासनाची भूमिका काय असा सवाल महापालिका स्थायी समितीच्या सभेत विचारण्यात आला. गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना पीओपीच्या गणेश मुर्तींबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ मूर्तीकार आणि उत्सव मंडळांमध्ये होवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सदस्यांनी केली.
नवे चंदीगड : इंडियन प्रीमियर लीगच्या धामधुमीनंतर आता भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या रंगमंचावर परतत आहे. ६ जूनपासून मुल्लानपूर येथील ...
मुंबई उच्च न्यायालय यांच्या जनहित याचिकेच्या निर्देशानुसार २४ जुलै २०२५ विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन तातडीने करणे पर्यावरणदृष्ट्या आवश्यक आहे. तसेच पीओपी मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपीचा पुर्नवापर आणि पुर्नवापर करण्याच्या बाबी सुचवण्यासाठी राज्य सरकार एक तज्ज्ञ वैज्ञानिक समिती नियुक्त करेल. पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने जलद विरघळवण्याच्या वैज्ञानिक पद्धतींचाही तज्ञ समिती अभ्यास करेल. तज्ञ वैज्ञानिक समिती मार्फत अद्यापी मार्गदर्शक तत्वे प्राप्त झाली नसत्यामुळे एकूण मूर्ती अवशेष साहित्यापैकी सुमारे १० टन वजनी विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया पुर्नवापर उत्पादन प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचे प्रस्ताविण्यात आले असल्याचे पर्यावरण विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:- बारामती शहर आणि परिसरात झालेल्या ...
त्यानुसार पीओपीच्या मूर्तींच्या अवशेषांचे विघटन करण्यासाठी सुमारे १० टन वजनी विसर्जित मुर्तींवर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी अकर्मा फाऊंडेशन या संस्थेची निवडकरण्यात आली आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून नाशिक येथे ३५० टन पेक्षा अधिक पीओपी गणेश मूर्तींवर प्रक्रिया केली जात आहे. यासाठी सेवा भावी संस्था अकर्मा फाऊंडेशन यांच्या माध्यमातूनसुमारे १० टन वजनी साहित्याचे काम प्रायोगिक प्रकल्प तत्वावर करण्यात आले आहे. यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी जर आपण पर्यावरण पुरक गणेशमूर्तीँसाठी प्रयत्न करत आहोत तर पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जित अवशेषांवर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न का करत आहोत असा सवाल केला. तर उबाठाच्या मिनाक्षी पाटणकर यांनी पर्यावरण पुरक गणेश मूर्तींसाठी शाळा आणि मंडळांमध्ये जनजागृती करण्यात यावी अशी सूचना केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी या पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जित अवशेषांवर प्रक्रिया कुठे केली जाते तसेच गणेशोत्सव दोन ते तीन महिन्यांवर आहे. त्यासाठी मूर्तीकारांनी मूर्ती घडवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तींबाबतचे धोरण काय आहे, प्रशासनाची भूमिका जाहीर करावी. जेणेकरून मंडळे आणि मूर्तीकारांमध्ये कोणत्याही प्रकारे गोंधळ उडणार नाही. त्यामुळे याची माहिती प्रशासनाने द्यावी अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान यांनी पर्यावरण दिनाच्या दिवशी पीओपीच्या विसर्जित गणेशमूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रस्ताव मंजूर करणे हे विरोधाभास असल्याचेही नमुद केले.यावर प्रशासनाच्यावतीने माहिती देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेतला असून मागील उत्सवातील विसर्जित गणेश मूर्ती संबंधित नियुक्त संस्थेने नाशिक येथे नेवून प्रक्रिया केली आहे. त्यामुळे या विसर्जित मूर्तींपासून पीओपी वेगळी करून त्यापासून अनेक वस्तू बनवल्या जात आहेत.





