Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024: प्रचाराच्या तोफा थंडावल्या!

Assembly Election 2024: प्रचाराच्या तोफा थंडावल्या!

मुंबई : मागील पंधरा दिवसापासून घमासान सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराची आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता सांगता होणार आहे. त्यानंतर आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. जाहीर प्रचार बंद होणार असला, तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात येतो. गुप्त बैठकांचे सत्रहो याच काळात सुरू होते. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे. त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले. यावेळी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Assembly Election 2024) हा मागील पंधरा दिवसापासून सुरू होता. वेगवेगळ्या मार्गाने उमेदवार प्रचार करत होते. यावेळी निवडणुकीमध्ये तीन पक्षांची मिळून महायुती आणि महाविकास आघाडी झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना चांगलीच दमछाक झाल्याचे देखील दिसून आले.

Devendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!

यावेळी उमेदवारांनी आपला पारंपारिक पद्धतीने म्हणजे पत्रक वाटणे, मतदारांच्या भेटी गाठी घेणे, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांना भेटणे, असा प्रचार करतानाच काहीसा हायटेक यंत्रणेचा देखील उपयोग करून घेतला जसे की चित्ररथ तयार करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याचा प्रयत्न असणे, वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी तयार करून आपल्या पक्षाची आणि चिन्हाची निशाणी ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास यावेळी सर्वच पक्षांचा प्रचार (Assembly Election 2024) हा हायटेकच झाल्याचे दिसून येत होते.

महायुती, महाविकास आघाडी, मनसे, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा शेवटच्या रविवारच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा घेण्यात आल्या. मतदारसंघातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेत, ‘तुमची मते आम्हालाच,’ असा वादाही अनेक उमेदवारांनी मतदारराजाकडून घेतला. मतदारराजा सुट्टीमुळे घरीच असल्याने अनेक कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी थेट घरोघरी जाऊन पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. (Assembly Election 2024)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -