Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकDevendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!

Devendra Fadnavis : तर आम्हीही मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमध्ये एल्गार

नाशिक : जर मतदानासाठी तुम्ही वोट जिहाद करत असाल तर आम्ही पण मतांसाठी धर्मयुद्ध करण्यास तयार आहोत, असा इशारा भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. आम्ही कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही, पण विरोधी पक्ष मात्र हा भेदभाव आमच्या माथ्यावरती मारत असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी सायंकाळी नाशिकमध्ये भाजपा उमेदवार देवयानी फरांदे सीमा हिरे आणि एडवोकेट राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थी अनंत हुतात्मा कान्हेरे मैदानामध्ये जाहीर सभा घेतली या सभेला महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले आणि भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

PM Modi : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे

वोट जिहादचे प्रकरण हे फक्त विरोधी पक्षांनी आपल्या सोयीसाठी म्हणून सुरू केलेले आहे कारण मुस्लिम धर्मांचे मत घेऊन त्यांना या राज्यात सत्ता उपभोगायची आहे आणि त्या बदल्यामध्ये सर्व विषय १२ पासून आतापर्यंत जे मुस्लिम धर्मांचे आरोपी विविध प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. त्यांची सुटका करायची आहे यासह विविध सत्र मागण्या असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हणूनच हे सर्व सुरू केलेले आहे आणि आता हे सर्व प्रकरण आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. तुम्ही वोट जिहाद करा आम्ही धर्मयुद्ध पुकारतो कारण आम्हाला आमच्या धर्माविषयी अभिमान आहे असे सांगून ते म्हणाले की सरकारने आजपर्यंत ज्या योजना राबवल्या त्यामध्ये कुठलाही भेदभाव केलेला नाही कुठल्याही विशिष्ट धर्माला डोळ्यासमोर ठेवून योजनांची अंमलबजावणी केलेली नाही मग हे का सुरू केले, असा प्रश्न फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या भाषणामध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, सरकारने विकासासाठी सर्व काही केलेला आहे आणि सर्व काही करत आहे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक पैसा देखील कमी पडू दिला जाणार नाही शहराच्या चारी बाजूने विकास केला जाईल, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले. आजपर्यंत भाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नाशिकचा विकास खुंटला होता आणि तो होऊ शकला नाही हे मोठे दुर्दैव आहे. शहराचा विकास आणि प्रगती करण्यासाठी म्हणून महायुतीचे उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी (Devendra Fadnavis) यावेळी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -