Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीDana Cyclone : दाना चक्रीवादळाचा धोका! 'या' भागात दिला अतिवृष्टीचा इशारा

Dana Cyclone : दाना चक्रीवादळाचा धोका! ‘या’ भागात दिला अतिवृष्टीचा इशारा

भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र खोल दाबात रूपांतरित झाले असल्यामुळे आज त्याचे ‘दाना’ या चक्रीवादळात (Dana Cyclone) रूपांतर होणार असल्याची बातमी समोर आली आहे. येत्या ४८ तासात ओडिशाच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असल्यामुळे किनारपट्टी लगतच्या सर्व भागात हवामान विभागाने अलर्ट मोड जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ ऑक्टोबर दरम्यान दाना चक्रीवादळ भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास १००-११० किमी राहील. वाऱ्याचा वेग प्रति तास १२० किमी पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे ओडिशा सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा?

हवामान विभागाने ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -