Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी शनिवारी केरळला जाणार, वायनाड भूस्सखल ठिकाणांचा करणार दौरा

पंतप्रधान मोदी शनिवारी केरळला जाणार, वायनाड भूस्सखल ठिकाणांचा करणार दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला केरळच्या वायनाडमध्ये भूस्सखलन प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान हवाई सर्वेक्षण करणार आहेत. वायनाडमध्ये भूस्सखलनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला.

३० जुलै २०२४ला केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्सखलन झाले. ४२० लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तर १५० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय कमीत कमी २७३ जण जखमी झाले.

सैन्य दल लवकरच संपवणार बचाव अभियान

सैन्यदलाचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांची विशेष टीम जंगलातील सूजीपारामध्ये सनराईज व्हॅलीमध्ये तपास अभियान सुरू आहे.

३० जुलैनंतर सुरू झालेले दहा दिवसांच्या बचाव अभियानानंतर भारतीय सैन्य दल लवकरच वायनाडमधून परतण्यासाठी तयार आहे. सैन्य दल हे बचाव अभियान एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर फोर्स आणि केरळ पोलिसांकडे सोपवणार आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्र सरकारकडे केले हे अपील

एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे मुख्यमंत्री म्हणाले की राज्याने केंद्र सरकारला ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आतापर्यंत ४२० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे आणि वायनाडमध्ये तपास तसेच बचाव अभियान सुरू आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -