काय केलं मनसैनिकांनी?
पिंपळगाव : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलनाक्यावर आमचे पदाधिकारी उभे राहतील असं सांगताच राज्यभरातील टोल नाक्यावर (Toll naka) मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांनी जाऊन टोलबंद आंदोलन केलं. सतत वादग्रस्त असलेल्या पिंपळगावच्या टोल नाक्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत एक तास टोल खुला केल्याने टोल कंपनीचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
आम्ही टोल नाका जाळून टाकू अशी भूमिका घेत घोषणाबाजी करत महिला मनसैनिकांनी आपली दबंगगिरी दाखविली. यावेळी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यभरात इतर ठिकाणीही टोलनाक्यांवर मनसैनिकांनी तुफान राडा केला आहे.
पिंपळगाव बसवंत येथील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हाध्यक्षा ज्योती शिंदे, अक्षदा घोडके, स्वागता उपासने, निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे, प्रकाश गोसावी, निलेश सोनवणे, भालेश जाधव, सतीश पाटील, राजू भवर, निलेश सोनवणे, गणेश देशमाने,जयेश ढिकले, नर्सिंग दरेकर, मनोज ठाकरे, गिरीष कसबे आदींसह मनसे कार्यकर्ते सहभागी होते.