Pahlaj Nihalani Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) यांचे मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (Bollywood News)
१९८० आणि १९९० च्या दशकात पहलाज निहलानी यांनी अनेक लोकप्रिय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुनांहो का फैसला, पाप की दुनिया, मिट्टी और सोना, सोला और शबनम आणि ऑंखे यांसारखे चित्रपट त्यांच्या निर्मिती संस्थेने प्रेक्षकांसमोर आणले होते.
मुंबई (Model Divyanshu Joshi Died ) : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील २६ वर्षीय मॉडेल दिव्यांशू जोशी याचा केरळमध्ये फोटोशूटदरम्यान (Photoshoot) ...
१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या इल्जाम या चित्रपटातून गोविंद यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी होते. त्यानंतरही गोविंदाच्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गोविंदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात निहलानी यांचे मोठे योगदान मानले जाते.
चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सेन्सॉरशिप आणि चित्रपट प्रमाणनाशी संबंधित अनेक निर्णय चर्चेचा विषय ठरले होते. कठोर भूमिका आणि स्पष्ट मतांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.
त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी निर्माता आणि महत्त्वाचा प्रशासक गमावला आहे.





