पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu) यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमी, ७ जुलै रोजी मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने देहूनगरीत तयारीला वेग आला असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी पालखीचा विसावा इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर ८ जुलै रोजी पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होईल. यावेळी मानाची पहिली आरती सूफी संत अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यात पार पडणार असून त्यानंतर पालखी पंढरपूरच्या (Pandharpur)दिशेने पुढील प्रवास सुरू करेल.
मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू होणार किंवा नवीन शैक्षणिक वर्षाची ...
संस्थानाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखीच्या रथासाठी नवीन व्यवस्था करण्यात येत असून रथ ओढण्यासाठी तीन नवीन बैलजोड्या खरेदी करून त्यांना रथास जोडण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक
७ जुलै: मंगळवार- पालखी प्रस्थान सोहळा (देहू) ८ जुलै: बुधवार- इनामदार साहेब वाडा ९ जुलै: गुरुवार- आकुर्डी (श्री विठ्ठल मंदिर) १० जुलै: शुक्रवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर ११ जुलै: शनिवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नानापेठ (पुणे) १२ जुलै: रविवार- लोणी काळभोर, कदम वाक वस्ती (नवीन पालखी तळ) १३ जुलै: सोमवार- यवत (भैरवनाथ मंदिर) १४ जुलै: मंगळवार- वरवंड (विठ्ठल मंदिर) १५ जुलै: बुधवार- उंडवडी गवळ्याची १६ जुलै: गुरुवार- बारामती, शारदा विद्यालय प्रांगण १७ जुलै: शुक्रवार- सणसर (पालखी तळ) १८ जुलै: शनिवार- निमगाव केतकी (पालखी तळ) १९ जुलै: रविवार- इंदापूर (पालखी तळ) २० जुलै: सोमवार- सराटी पालखी तळ (निरा स्नान) २१ जुलै: मंगळवार- आकलूज २२ जुलै: बुधवार- बोरगाव श्रीपूर २३ जुलै: गुरुवार- पिराची कुरोली २४ जुलै: शुक्रवार- वाखरी २५ ते २८ जुलै: - पंढरपूर मुक्काम व आषाढी एकादशी सोहळा २९ जुलै: बुधवार- पालखीचा देहूकडे परतीचा प्रवास
सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या विविध प्रकल्प कामांमध्ये ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) निमित्ताने देहू, आळंदीसह राज्यातील विविध भागांतून पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठ्ठल भक्ती, समता, बंधुभाव आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. त्यामुळे यंदाच्या वारीकडेही राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.





