Thursday, June 4, 2026

School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू होणार किंवा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार, अशा अफवा सोशल मीडियावर (Social Media) पसरत होत्या. मात्र, शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

१५ जूनलाच शाळा सुरू होणार

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहे. शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाईन (Online) पद्धतीने शिक्षण दिले जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन (Offline) शिक्षणातूनच होणार आहे. राज्य मंडळाच्या शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी पूर्वीचे शैक्षणिक वेळापत्रक कायम राहणार आहे. तसेच इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन विदर्भातील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून विदर्भासह राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >