Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

अजित पवारांच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुणे यांचा हिस्सा

सूर्यकांत आसबे

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याच्याच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांना टीकेचे लक्ष्य केले.

ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवार यांनी माझ्या आरोपांना उत्तर द्यावे असे सांगत याचे आपल्याकडील कागदोपत्री असलेले पुरावे आपण उद्या ईडी आणि उच्च न्यायालय व सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकासह आघाडी सरकारने केलेले भ्रष्टचार हि दरोडेखोरी असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली. शरद पवार आणि कुटुंबियांना किरीट सोमय्यांनी याप्रकरणी चॅलेंज केले आहे. अजित पवार आणि नातेवाईकांवर केलेले आरोप चुकीचे असतील तर सिद्ध करा असे आव्हान सोमय्या यांनी शरद पवार यांना दिले आहे.

अजित पवारांनी बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली..?असा संतप्त सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून १८४ कोटींचे बेइनामी व्यवहार इडीच्या छाप्यात सापडली आहे..शिवाजी व्हेन्चर प्रायवेट लिमिटेड, इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची ? या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी १०० कोटी दिले होते. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला तसा अजित पवार परत करणार आहेत का, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

Comments
Add Comment