मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) (अजित पवार गट) मोठे नाराजीनाट्य रंगले आहे. पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्याची अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फेटाळल्यामुळे कमालीचे नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली. या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादीने रात्री उशिरा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अशावेळी भुजबळांसारखा मोठा ओबीसी (OBC) चेहरा दुरावू नये, म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आज सकाळीच भुजबळ यांच्या 'सातपुडा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर भुजबळ आणि पटेल राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या सातत्यपूर्ण बैठका सुरू होत्या. या जागेसाठी छगन भुजबळ हे स्वतः अत्यंत उत्सुक होते. मात्र, आपण दिल्लीत गेल्यानंतर राज्यातील आपल्या वाट्याचे कॅबिनेट मंत्रिपद आणि आमदारकी कुटुंबाबाहेर जाऊ नये, यासाठी त्यांनी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात संधी देण्याची अट पक्षासमोर आणि भाजप श्रेष्ठींसमोर ठेवली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अट भाजप नेतृत्वाने अमान्य केली. त्यामुळे भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यसभेवर जाण्यास म्हणजेच पक्षाची उमेदवारी घेण्यास स्पष्ट नकार दिला.
जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. विशेष ...
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत आधीच अंतर्गत कुरबुरी सुरू असताना, छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादीला मोठी महागात पडू शकते. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचेच खंदे समर्थक असल्याने, भुजबळांचा संताप शांत करण्याची मुख्य जबाबदारी पटेल यांच्यावर सोपवण्यात आली. दरम्यान, भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात प्रफुल्ल पटेल यांना यश आले असून, दोन्ही ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकत्र विधानभवनात दाखल झाले आहेत.
मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन दुचाकी, एक टॅक्सी आणि ओला-उबेर वाहनाला ...
छगन भुजबळ यांनी नकार दिल्याने शनिवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पक्षाने त्यांच्या निष्ठेची दखल घेत २०१२ मध्ये त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवले होते. २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या परिणय फुके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही ते विदर्भातील पक्षाचे काम पाहत होते, आता त्यांना थेट दिल्लीची लॉटरी लागली आहे.





