डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले की, एका तरुणाने एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडित मुलींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक विद्यार्थ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या ...
पालघरमध्ये वाढत्या फसवणुकीच्या घटनांबाबत चिंता :
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पालघर जिल्ह्यात तरुणींना प्रेमाच्या आमिषाने परदेशात नेल्याच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली. काही प्रकरणांमध्ये तरुणींना शिक्षण किंवा नोकरीच्या नावाखाली परदेशात नेण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे मानसिक तणावातून जात असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे : पुण्यातील (Pune) कॅम्प परिसरात स्वतःला पोलीस उपनिरीक्षक (PSI - Police Sub Inspector) असल्याचे भासवून फिरणाऱ्या २५ वर्षीय तोतया महिला पोलिसाला (Fake Woman Police Officer) लष्कर ...






