Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकाश्मीरमधील शिक्षकांच्या हत्येचा कल्याणमध्ये भाजपकडून निषेध

काश्मीरमधील शिक्षकांच्या हत्येचा कल्याणमध्ये भाजपकडून निषेध

कल्याण (वार्ताहर) : जम्मू-काश्मिरमध्ये असलेली शांतता दहशतवाद्यांना सहन होत नसून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर होणारे हल्ले यातच दशतवाद्यांची निराशा दिसून येत आहे. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत असे प्रतिपादन भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.

काश्मीरमधील दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप शहर सचिव राजेश सिंग यांनी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, उत्तर भारतीय मोर्चाचे शहर सचिव अश्विन शुक्ला, उपाध्यक्ष सच्चीदानंद दुबे, अजय गुप्ता, वॉर्ड क्र ४ अध्यक्ष नीरज मिश्रा, ललित सारंग, भास्कर तीठे, राजकुमार सारस्वत, किशोर चौधरी, आलोक उपाध्याय, प्रा. आर आर त्रिपाठी, दीनानाथ तिवारी, श्रीकांत उपाध्याय, सी एस पांडे, राम अवध यादव, पी पी सिंग, श्रीनाथ सिंग, प्रमोद सिंग यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -