२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार
मुंबई : आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली असून, त्यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणामुळे राज्यभरात प्रचंड गाजलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असलेल्या या संवेदनशील विभागात मुंढे यांची झालेली एन्ट्री प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्य शासनाने मंगळवारी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये मुंढे यांच्यासह अन्य चार महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली होती. या विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून ही लाच मागितली गेल्याचा खळबळजनक आरोप त्यावेळी झाला होता. या लाचप्रकरणामुळे एफडीए विभाग कमालीचा चर्चेत आला होता. आता याच विभागात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यामुळे विभागातील भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहारांना चाप बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरातला अटक करण्यास 'ईडी'ला न्यायालयाची परवानगी
नाशिक : धार्मिक विधी आणि पूजेच्या नावाखाली व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मनी ...
अन्य महत्त्वाच्या बदल्या बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.कान्हूराज बगाटे यांच्यावर 'महामुंबई मेट्रो'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदाची नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आर. एस. चव्हाण यांची मुंबईतील प्रसिद्ध 'हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय खंदारे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दरम्यान, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडील सध्याच्या खात्यांसह ही जबाबदारी ते सांभाळतील.View this post on Instagram






