Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीSikkim Flood: सिक्कीम जलप्रलयात १९ जणांचा मृत्यू, ३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

Sikkim Flood: सिक्कीम जलप्रलयात १९ जणांचा मृत्यू, ३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

गंगटोक: सिक्कीमधील(sikkim) ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही माहिती दिली. लष्कर आणि एनडीआरएफची टीम तीस्ता नदीच्या जलग्रहण क्षेत्रात तसे उत्तर बंगालच्या खालच्या भागात दुसऱ्या दिवशीही बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.

सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर सिक्कीममध्ये ल्होनक तलावावरील ढगफुटीनंतर बुधवारी अचानक आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत १९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. २२ जवानांसह १०३ जण बेपत्ता आहेत.

१८ मृतदेहांची ओळख पटली

शेराजील राज्य पश्चिम बंगाल सरकारने आपल्या विधानात म्हटले की १८ मृतदेहांपैकी चार जण लष्कराचे जवान होते. दरम्यान, हे स्पष्ट नाही की त्या बेपत्ता २२ जवानांमध्येच यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या २६ लोकांना सिक्कीमधील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

३ हजाराहून अधिक पर्यटक अडकले

पाठक यांच्या माहितीनुसार उत्तर सिक्कीमधील लाचेन, लाचुंग आणि आसपासच्या क्षेत्रात अडकलेले पर्यटक सुरक्षित आहेत. परदेशी नागरिकांसह ३ हजाराहून अधिक पर्यटक सिक्कीमच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -