Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडी16 MLA disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी आता थेट पुढच्या वर्षी?

16 MLA disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी आता थेट पुढच्या वर्षी?

सर्वोच्च न्यायालयाची तारीख गेली आणखी लांबणीवर…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केला त्या घटनेला वर्ष उलटले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLA disqualification) प्रश्न मार्गी लागण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. सत्तासंघर्षाचा निकाल मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदारांचा प्रश्न मात्र विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवला होता. तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. सुनावणीसाठी अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या मात्र प्रत्येक वेळी काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही सुनावणी ३ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

सलग चौथ्यांदा आमदारांच्या अपात्रतेची सुनावण लांबणीवर गेली आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ ऑक्टोबर ही तारीख दिली होती. त्यानंतर ६ ऑक्टोबर, मग ९ ऑक्टोबर आणि आता थेट ३ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना या सुनावणीबाबत एक निश्चित वेळापत्रक तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार ते तयारही करण्यात आलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाची तारीख सातत्याने लांबणीवर जात आहे.

दरम्यान, या संभाव्य वेळापत्रक, कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या आमदार अपात्र प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर असल्याने आता जानेवारी २०२४ मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी निश्चित केलेलं वेळापत्रक :-

  • १३ ऑक्टोबर : याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी.
  • १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर : दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार
  • २० ऑक्टोबर : सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाणार आणि काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार.
  • २७ ऑक्टोबर : दोन्हीही गट आपापलं म्हणणं (स्टेटमेंट) मांडणार.
  • ६ नोव्हेंबर : दोन्ही गट आपली बाजू मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील.
  • १० नोव्हेंबर : दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार.
  • २० नोव्हेंबर : दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार.
  • २३ नोव्हेंबर : साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार.

सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -