Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलआपले भारतरत्न - लता मंगेशकर

आपले भारतरत्न – लता मंगेशकर

‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशाची कीर्ती वाढवणा-या व्यक्तीला भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहेत. सिनेसंगीतात केलेल्या अजोड कामगिरीबद्दल त्यांना ‘गानकोकिळा’ हा किताब दिला गेला आहे. ‘लतादीदी’ नावानेही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात इ. स. १९४२ मध्ये झाली.

त्यांनी वीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये ९८० पेक्षा अधिक चित्रपटगीतं गायली आहेत. १९७४ ते १९९१ या काळात सर्वात अधिक गाणी गाण्याचा त्यांच्या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात शीख मोहल्ल्यात झाला. आपले वडील

पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. २००१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -