Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीBandra Complex : वांद्रे पश्चिममध्ये उभारणार क्रीडा संकुल

Bandra Complex : वांद्रे पश्चिममध्ये उभारणार क्रीडा संकुल

मुंबई  : वांद्रे पश्चिम येथील क्रीडा संकुलासाठी राखीव असलेला भूखंड आता महापालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. सार्वजनिक सुविधेकरता आरक्षित असलेली असलेल्या या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी सुमारे ९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. वांद्रे पश्चिम येथील नगर भू क्रमांक ११४१, ११५३, ११७१, ११७२ आणि ११७३ भाग ही धारण करणारी ही क्रिडा संकुलाच्या आरक्षण असणारी एकूण २०३८.४३ चौर मीटरची जमीन असून ही जमिन संपादीत करण्याची प्रक्रिया आता राबवली जात आहे. हा मोठ्या अस्तित्वातील सुविधेचा भाग म्हणून नाट्यगृहामुळे बाधित असून हा भूखंड रहिवाशी क्षेत्रात मोडत आहेत. तसेच हा भूखंड रस्त्याने बाधित आहे. तसेच हा भूखंड सीआरझेड दोन अंतर्गत समाविष्ठ असल्याची माहिती महापालिकेच्या विकास नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली

हा भूखडावर संरक्षक भिंती व्यतिरिक्त असून क्रीडा संकुल आरक्षणाच्या दक्षिण बाजूस बाग, बगिचा या आरक्षणाने बाधित आहे. मागील डिसेंबर २०१८मध्ये भाजपाच्या तत्कालिन नगरसेविका स्वप्ना म्हात्रेय नी क्रीडा संकुलाची आरक्षित जागा ताब्यात घेण्याची मागणी केली होती, तर एच पूर्व विभागाच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२४मध्ये आरक्षित असलेली ही जमीन विकास हक्क हस्तांतरणाच्या अर्थात टिडीआरच्या बदल्यात हस्तांतरीत करण्यास संबंधित विकासकाला विनंती केली होती. परंतु ही आरक्षित जमिनी टिडीआरच्या बदल्यात महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता; परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भविष्यात ही जमिन टिडीआरच्या बदल्यात संपादित करण्याची शक्यता मावळली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे ही जमिन संपादित करण्याची प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल ९८.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यमुळे ही जमिनी सुधारीत महाराष्ट्र प्रादेषिक नगररचना अधिनियम, १९६६च्या कलम १२६ (१) (ब) व (क)मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला अर्ज करण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षित भूखंडांचे अंतिम क्षेत्रफळ ठरविताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संयुक्त मोजणी केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -