Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उंबरठाण परिसरात हादरे

मिळालेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर या गावांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत अनेकदा जमिनीचे हलके धक्के जाणवले. ५ मार्च रोजी रात्री सुमारे ११.५२ वाजता अचानक जमिनीतून मोठे आवाज ऐकू आले आणि काही मिनिटे जमीन हादरली.

पुन्हा एकदा धक्क्यांची नोंद

यानंतर ६ मार्च रोजीदेखील पुन्हा एकदा जमिनीला हलके हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार असे धक्के जाणवत असल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. लहान मुले आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

जमिनीतून गूढ आवाज

राशा गावाजवळील डोंगराळ भागातून विचित्र आवाज येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्या आवाजानंतर काही मिनिटे जमीन हलते, शिवाय काही घरांच्या भिंतींना तडे ही गेले आहेत.

भूकंपमापन यंत्र बसवण्याची मागणी

या वारंवार होणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. परिसरात तातडीने भूकंपमापन यंत्र बसवून परिस्थितीचा अभ्यास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सतत जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे संपूर्ण भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा