भारताचा शेवटचा रस्ता कोणता? तुम्हाला माहिती आहे का?

दक्षिण भारताच्या टोकावर वसलेले धनुषकोडी हे ठिकाण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

भारताच्या मुख्य भूमीचा हा शेवटचा रस्ता नॅशनल हायवे ८७ म्हणून ओळखला जातो.

जो रामेश्वरमपासून सुरू होऊन अरिचल मुनई येथे संपतो.

रामेश्वरमपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर धनुषकोडी वसलेले आहे. 

हा रस्ता पंबन बेटाच्या दक्षिण टोकावर असून एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर असा विलोभनीय देखावा येथे पाहायला मिळतो. 

या रस्त्याच्या शेवटी अरिचल मुनई हा बिंदू आहे, जिथून श्रीलंका केवळ १८ ते २० किलोमीटर अंतरावर आहे.

धनुषकोडीचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच तो दुःखदही आहे. 

धनुषकोडी'चा अर्थ 'धनुष्याचे टोक' असा होतो.

पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीरामांनी लंका विजयासाठी 'राम सेतू' बांधण्याची सुरुवात याच ठिकाणाहून केली होती.

Click Here