Saturday, April 27, 2024
Homeदेशकर्नाटकची सिनी शेट्टी 'मिस इंडिया २०२२'ची मानकरी

कर्नाटकची सिनी शेट्टी ‘मिस इंडिया २०२२’ची मानकरी

नवी दिल्ली (हिं.स.) : कर्नाटकची सिनी शेट्टी मिस इंडिया २०२२ ची मानकरी ठरली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘मिस इंडिया २०२२’ ची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत ३१ फायनलिस्ट होते. सिनी शेट्टीने या सगळ्यांना मात देत ‘मिस इंडिया २०२२’चा किताब पटकावला. या अंतिम फेरीत राजस्थानच्या रुबल शेखावने फर्स्ट रनर अपचा खिताब जिंकला आहे. तर, उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली.

मलायका अरोरा, नेहा धुपिया, डिनो मोरेया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा परिक्षकांच्या पॅनेलमध्ये समावेश होता. ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री कृति सेनन, मनीष पॉल, राजकुमार राव यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नेहा धुपियाला मिस इंडियाचा खिताब पटकावून २० वर्ष पूर्ण झाली असून त्याच यावेळी सेलिब्रेशनंही करण्यात आले.

वीएलसीसी ‘मिस इंडिया २०२२’ चा ग्रॅंड फिनाले कलर्स एचडी वाहिनीवर १७ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ वाजता प्रसारित होणार आहे.

कोण आहे सिनी शेट्टी ?

सिनी शेट्टी ही २१ वर्षाची असून तिचा जन्म मुंबईचा आहे. पण ती कर्नाटकची राहणारी आहे. सिनीने अकाऊंट आणि फायनान्समध्ये डिग्री घेतली आहे. आता ती सीएफएचे देखील शिक्षण घेत आहे. याशिवाय सिनी भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील घेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -