Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीठाण्याच्या जॉर्डन सिक्वेराची भारतीय हवाईदलात निवड

ठाण्याच्या जॉर्डन सिक्वेराची भारतीय हवाईदलात निवड

मुंबई : भारतीय हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर ठाण्यातील बावीस वर्षीय जॉर्डन सिक्वेरा या युवकाची नुकतीच निवड झाली असून शहरात सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे. देश रक्षणात ठाणेकर युवक नेहमीच आघाडीवर राहिले आहेत, याचे हे एक उदाहरण आहे.
लहानपणापासूनच भारतीय हवाईदलात भरती होण्याच स्वप्न जॉर्डन पाहिलं होते, स्वप्नपूर्तीची तयारी तो शालेय जीवनापासूनच करत होता.औरंगाबाद येथील संस्थेत केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या एन डी ए परीक्षेची तयारी त्याने केली होती अगदी पहिल्याच प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला .

वाचन, खेळ आणि प्रवास या त्याच्या आवडी आहेत , यामुळेच आपली वायुदलात निवड झाली असे तो मानतो .वाचन आणि प्रवास आपलं जीवन समृद्ध करतात तर आपली शारीरिक क्षमता मानसिकता समृद्ध आणि कणखर बनते खिलाडूवृत्ती जोपासली जाते .अस त्याच वैयक्तिक मत आहे ,म्हणून तर तो तरुणांना वाचन तर कराच तसच खेळात भाग घ्या खेळत रहा अस आवाहन करतो .

जॉर्डन सिक्वेरा हा राष्ट्रीय पातळीवरचा बास्केटबॉलचा युवा खेळाडू आहे , आपल्या या आवडत्या खेळावरच प्रेम त्याने असेच अबाधित ठेवलं असून हैदराबाद येथील एअरफोर्स अकॅडमी मध्ये सुवर्ण व रजतपदक जिंकलं आहे .

जॉर्डनचे वडील लॉरेन्स सिक्वेरा आयटी प्रोफेशनल आहेत तर आई सौ लीना ही सिंघानिया शाळेत शिक्षिका आहे .ठाणे येथील मेजर गावंड यांनी जॉर्डनला भरती संदर्भात मार्गदर्शन अन प्रेरणा दिली , ठाण्यातील शौर्य डिफेन्स एकेडमी च्या संचालिका सौ वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी जॉर्डनला मार्गदर्शन केले

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -