Saturday, April 27, 2024
Homeअध्यात्मप्राणिमात्रांचे उपजत ज्ञान

प्राणिमात्रांचे उपजत ज्ञान

आम्ही सगुण परमेश्वराची जी व्याख्या केली परमेश्वर हे आपल्या जीवनाचे मूळ आहे व तेच आपल्या जीवनाचे फळही आहे. परमेश्वर आपल्या जीवनाशी इतका निगडीत आहे की, पानही त्याच्याशिवाय हलू शकत नाही. पानही त्याच्याशिवाय जर हलत नाही, तर त्याच्या सत्तेशिवाय आपला हात, आपला पाय कसा हलणार? आपण बोलणार कसे? पण ही गोष्ट लक्षात येणं कठीण आहे. हे सगळे गाडे बिघडलेले आहे, ते एकाच गोष्टीमुळे. ते म्हणजे भ्रम. हा भ्रम विशेषतः माणसाला झालेला आहे. इतर प्राण्यांना भ्रम वगैरे काहीही नसते. ते फक्त असतात. ते जे काही करतात ते निसर्गाच्या नियमांप्रमाणेच करतात. घर बांधायचे झाले, तर माणसाला विचार करावा लागतो. प्राणिपक्ष्यांना घर बांधायचे झाले, तर ते विचार करत नाहीत. त्यांच्या ठिकाणी जी उपजत बुद्धी असते, त्या उपजत बुद्धीप्रमाणे ते करतात. चिमणी आपले घरटे तयार करते, ते ती तिच्या ठिकाणी असलेल्या उपजत बुद्धीप्रमाणे करते. प्रत्येक पक्षी हा आपले घरटे बांधतो, तो त्याच्या ठिकाणी असलेल्या उपजत बुद्धीप्रमाणे बांधतो यालाच उपजत ज्ञान म्हणतात.

माणसेसुद्धा अनेक गोष्टी करतात ते उपजत ज्ञानाने करतात. सर्व प्राणिमात्रांमध्ये जे असते, ते उपजत ज्ञान असते. हे जे उपजत ज्ञान आहे ते सर्व प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या तáऱ्हेने दिसते. वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून ते उपजत ज्ञान वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. गाईचे वेगळे, रेड्याचे वेगळे, वाघाचे वेगळे, जलचरांचे उपजत ज्ञान वेगळे. या सर्वांकडे उपजत ज्ञानच असते. पण त्यांचे प्रकट होण्याचे प्रकार वेगळे. व्हीडिओतून इलेक्ट्रिसिटीची सत्ता प्रकट होते, तेव्हा आपल्याला दृश्य दिसते व आवाजही ऐकू येतो. रेडिओतून इलेक्ट्रिसिटीची सत्ता प्रकट होते, तेव्हा आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. म्हणजे रेडिओच्या माध्यमातून तीच वीज प्रकट होते.¸ टीव्हीच्या माध्यमातून तीच वीज प्रकट होते.¸ व्हीडिओच्या माध्यमातून तीच वीज प्रकट होते.¸ पंख्याच्या माध्यमातून तीच वीज प्रकट होते. अशा प्रकारे वीजेची सत्ता सगळ्या उपकरणांमधून वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. तसेच ही दिव्यशक्ती जी आहे ती निरनिराळ्या माध्यमातून प्रकट होताना वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते.

हे जर लक्षात ठेवले, तर वाघ हा वाघासारखाच असणार, तो गाईसारखा नसणार. सिंह हा सिंहासारखाच असणार, तो बैलासारखा नसणार. कोल्हा हा कोल्ह्यासारखाच असणार, तो कुत्र्यासारखा नसणार. सांगायचा मुद्दा¸ हे जे उपजत ज्ञान आहे, ते सर्व प्राण्यांमध्ये आहे, तसे ते माणसांमध्येसुद्धा आहे. हे जे प्रकटीकरण आहे ते निरनिराळ्या माध्यमांतून होते. वीज कशी प्रकट होते तसे हे आहे. हा सर्व विषय नीट समजून घेतला पाहिजे. पण आतापर्यंत माझ्या वाचनात जेवढे आले¸ मी जे ऐकलेले आहे त्यात हे कुणीही सांगितलेले नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर खूप समस्या सुटतील.

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -