Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआयकर कायद्यातील फॉर्म १० ए आणि फॉर्म १० एबी

आयकर कायद्यातील फॉर्म १० ए आणि फॉर्म १० एबी

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

आयकर कायद्यातील ८० जी या कलमांची माहिती आपण यापूर्वी करून घेतली आहे. विविध न्यास, सामाजिक संस्था, गैर सरकारी संस्था यांना दिलेल्या देणगीवर देणगी देऊ करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यास काही मर्यादेत आयकरात सवलत मिळते. देणगी स्वीकारणाऱ्या संस्था बहुमोल असे सामाजिक कार्य करीत असतात. यातील मोठ्या कॉर्पोरेटच्या स्वतःच्या सीआरएस फंडाच्या बळावर काम करणाऱ्या किंवा मुंबई ग्राहक पंचायतसारख्या सदस्यांच्या वार्षिक वर्गणीवर स्वयंपूर्ण झालेल्या काही निवडक संस्था सोडल्या, तर बहुतेक सर्वाना कार्यकर्ते, मदतनीस आणि पैसे यांची सातत्याने चणचण भासते. अनेक ठिकाणी ही सवलत देणगी रकमेच्या ५०%, तर काही ठिकाणी ती १०० % आहे. केवळ आर्थिक स्वरूपातील मदतीलाच ही सवलत लागू असून या सवलती व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या एकूण सामाजित उत्पन्नाच्या (Adjusted income) १०% या मर्यादेतच मिळतात.

सन २०२० पूर्वी अशा संस्थांना केवळ एकदाच ही सवलत मिळवण्यासाठी अर्ज करावा १०जी लागत असते. एकदा मंजुरी मिळाली की आयुष्यभरात त्यासाठी काहीही करावे लागे. ही मंजुरी आयकर विभागाने कोणतीही हरकत घेईपर्यंत तहहयात होती आता त्यात बदल करण्यात आला असून या सर्वांना फॉर्म १० एबी दाखल करावा लागतो. पूर्वापार ज्या संस्था या सवलतीचा लाभ घेत आहेत, त्यांना दर पाच वर्षांनी हा फॉर्म भरावा लागेल, तर नव्यानेच अस्तित्वात असलेल्या संस्थांना तात्पुरत्या मंजुरीसाठी १० ए हा फॉर्म भरावा लागेल. त्यांना मिळालेली मंजुरी सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी असेल, तर जुन्या संस्थांना ती पाच वर्षांसाठी असेल. हे दोन्ही फॉर्म जवळपास सारखेच असून त्यात सहा विभाग आहेत.

आता फॉर्म १० एबी वेगवेगळ्या कारणांसाठी दाखल करता येईल.
विद्यमान नोंदणी/ मंजुरीचे नूतनीकरण आयकर कायदा १०(२३ सी) यात विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये, १२ ए व ८० जीमध्ये धर्मादाय ट्रस्ट, धार्मिक संस्था, कल्याणकारी संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा समावेश होतो आणि विद्यमान संस्थांना दर पाच वर्षांनी अशी नोंदणी आवश्यक आहे. तात्पुरत्या नोंदणीचे नियमित नोंदणीत रूपांतर, न्यास अथवा संस्थेच्या नियमावलीत बदल, निष्क्रिय नोंदणी सक्रिय करण्यासाठी या सर्व गोष्टी दिलेल्या मर्यादेत पूर्ण कराव्या लागतात.
उदाहरणार्थ –
तात्पुरत्या नोंदणीचे नियमित नोंदणीत रूपांतर उपक्रम सुरू झाल्यावर सहा महिन्यांच्या आत किंवा नोंदणी मुदत संपण्यापूर्वी यातील जे आधी असेल तेव्हा पूर्ण करावे लागते.

न्यास आणि संस्थेच्या नियमावलीमध्ये बदल केल्यावर तीस दिवसांच्या आत फेरफार नोंदवावा लागतो.
निष्क्रिय नोंदणी सक्रिय करण्यासाठी वर्ष सुरू होण्यापूर्वी सहा महिने आधी जेव्हापासून ही नोंदणी सक्रिय करण्याची प्रक्रिया करावी लागते.

फॉर्म १० ए आणि १० एबी भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती –
न्यास/संस्थेच्या घटनेची प्रमाणित
प्रत २ प्रति,
परदेशी चलन नियमन कायद्याचे (असल्यास) प्रमाणपत्र,
न्यास/संस्थेची मागील तीन वर्षांची लेखपरीक्षकाने प्रमाणित केलेली
आर्थिक विवरणपत्रके,
विश्वस्त/सदस्य यांची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे,
ट्रस्ट/ संस्था यांनी केलेल्या
कार्याची माहितीपत्रके,
आयकर कायद्याच्या ८०जी नुसार केलेल्या नोंदणीची अथवा मंजुरीची प्रमाणित प्रत,
उद्दिष्टांमध्ये बदल करायचे असतील, तर त्या दस्ताच्या प्रमाणित प्रती, पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असे आता ऑनलाइन करावी लागते.
यासाठी – आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर जा.
ई फाईल टॅबवर जाऊन आयकर विभागातील फॉर्मसवर जा. करसूट सवलत या शीर्षकाखाली १० ए आणि १० एबी हें फॉर्म उपलब्ध आहेत.

१० ए फॉर्म सुरुवातीस एकदाच वापरला जातो, यानंतर १० एबी फॉर्म भरावा लागत असल्याने त्यातून योग्य फॉर्म निवडा आणि त्यास लागू असलेले मूल्यांकन वर्ष निवडा फॉर्ममध्ये आपल्याला लागू असलेले तपशील भरा, अन्य ठिकाणी लागू नाही असा शेरा द्या आणि फॉर्म जतन करा. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी जोडा. यासाठी – संस्थेचे नाव न्यास अथवा संस्थेचा प्रकार आणि ध्येय, संस्थेचा व्यवस्थापनाचा पॅन, आधार क्रमांक, संस्था किंवा न्यासाने आयोजित केलेले उपक्रम.

सर्व माहिती भरल्यावर पुढे चला (continue) वर क्लीक करा.
डिजिटल सही वापरून किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ओटीपी मिळवून अर्ज प्रमाणित केल्यावर अर्जदाराच्या बाजूने ही प्रक्रिया पूर्ण होईल. सहाय्यक आयुक्त अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे तपासून समाधान झाल्यावर अर्ज मंजूर करतात. यासंबंधात सातत्याने विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे – सतत विचारले जाणारे प्रश्न…

ट्रस्ट, संस्था किंवा एनजीओ या आधीच नोंदणीकृत असल्यास, त्यांना फॉर्म क्रमांक १०एबी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे का? होय, प्रत्येक ट्रस्ट, संस्था किंवा एनजीओने नोंदणीसाठी नवीन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर पोर्टलवर फॉर्म क्रमांक १०ए आणि १०एबी सक्रिय करण्यात आले आहे काय?

होय, प्राप्तिकर पोर्टलवर फॉर्म क्रमांक १०ए आणि १०एबी सक्रिय करण्यात
आला आहे.
फॉर्म क्रमांक १०ए आणि फॉर्म क्रमांक १०एबी भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा संच वेगळा आहे का?
नाही, ते कागदपत्रांचे समान संच आहेत, ज्यात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र/विश्वास प्रमाणपत्र, FCRA प्रमाणपत्र, १० (२३ सी) मंजुरी/नकार आदेश आणि गेल्या तीन वर्षांचे वार्षिक व्यवहार खाते (४४एबी ऑडिट रिपोर्टसह) समाविष्ट आहे. फक्त काही यादी करण्यासाठी.

ट्रस्ट, संस्था किंवा एनजीओ नवीन नोंदणीसाठी कधी अर्ज करू शकतात?
नवीन नोंदणीसाठी अर्ज विवरणपत्र दाखल वर्ष (Assessment Year) सुरू होण्याच्या एक महिना आधी भरावा लागतो, ज्यामध्ये सेवाभावी उपक्रम सुरू करावे लागतात.
अतिशय सोपी आणि पारदर्शक पद्धतीची ही प्रक्रिया असून ती वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे.
mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -