Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीकपालेश्वर मंदिरात पूजेचा अधिकार कुणाला?

कपालेश्वर मंदिरात पूजेचा अधिकार कुणाला?

गुरव कंपनीचे भांडण निवाड्यासाठी न्यायालयाच्या दरबारात

नाशिक : भोळ्या महादेवासमोर नंदी नसलेले पृथ्वी तलावरील एकमेव मंदिर म्हणून प्रख्यात असलेले नाशिकच्या रामकुंडावरील कपालेश्वर महादेव मंदिर अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने पुजारीच पावित्र्य कलंकित करीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आधी विश्वस्त आणि पुजारी यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध, दानपेटीबाबतचे राजकारण करणाऱ्या पुजाऱ्यांच्या वर्तनामुळे भोळा म्हणून ओळखला जाणारा महादेव नाहक बदनाम होत आहे आणि आता तर मंदिरात पूजा कुणी करायची याबाबत नव्याने वाद उपस्थित केला गेला असून थेट जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.

यातील वादी प्रभाकर श्रीधर गाडे शामराव श्रीधर गाडे,ॲड अविनाश श्रीधर गाडे,प्रसाद शरदचंद्र गाडे,जगदीश शरदचंद्र गाडे, रुपाली हेमंत गाडे, मिलिंद अरविंद गाडे यांनी हेमंत उर्फ पप्पू पद्माकर गाडे, प्रकाश उर्फ साहेबराव पद्माकर गाडे, प्रभावती चंद्रकांत जगताप, अनिल जनार्दन भगवान, रमाकांत सोनोजी शेवाळे, अनिता अनिल शेवाळे यांच्याविरुद्ध नशिक जिल्हा न्यायालयात स्पेशल सिव्हिल सुट क्र. 0000255/2024 Specific relief act ३४,३८ प्रमाणे दाखल केला असून या दाव्यामुळे कपालेश्वर मंदिरात कोणते गुरव पूजा करू शकतात याबाबत नागरिकांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

नेमका हा वाद का?

दानपेटी मधील पैशावरून हा वाद झाला आहे अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून शहरात सुरु आहे. ज्यांनी दावा दाखल केला ते वादी यांना प्रतिवादी हेमंत उर्फ पपू पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून रोखत आहेत. सदर वाद हा मागील २० दिवसापासून चालू असून दावा दाखल केलेले गुरव आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रतिवादी पप्पू उर्फ हेमंत पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून थांबवत असून मंदिरात येणारे दानपेटी मधील सर्व पैसे स्वतःच घेत असल्याचा आरोप काही भक्त करीत आहेत.

नाशिक शहरातील अतिप्राचीन असलेले कपालेश्वर महादेव मंदिर येथे गुरव लोकांमध्ये मध्ये वाद चालू आहे. त्या अनुषंगाने गुरव ॲड अविनाश श्रीधर गाडे यांच्या बाजूने ७ परीवार तर यांनी गुरव हेमंत उर्फ पपू गाडे यांच्या बाजूने ६ परीवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात एक सूट दाखल केला असून उद्या त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी आहे. संबंधित गुरव यांच्या ताब्यात एक दानपेटी असून सदर दानपेटी मध्ये येणाऱ्या पैशातून हा वाद निर्माण झाला आहे. ॲड अविनाश गाडे यांनी दाखल केलेल्या सूटमध्ये १० लाख रुपये दानपेटीमध्ये आलेले असून त्याची नुकसान भरपाई ही वादी ॲड अविनाश गाडे व इतर गुरव यांनी मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला आहे असे समजते. – प्रशांत जाधव, अध्यक्ष, कपालेश्वर संस्थान

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -